आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 16 जून रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : भगवा| अंक : २
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल.
वृषभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज. मुलांचे मस्तीचे प्रमाण वाढेल.
मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : १
व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.
कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करायला आज दिवस उत्तम. व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील.
सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आज कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. खर्चावर ताबा ठेवा.
कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अति धावपळ टाळा. आज हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. आज मित्र मोलाचे सल्ले देतील.
तूळ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज प्रत्येक कामात उत्साह राहील. सकारात्मकता वाढेल.
वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
उद्योग-व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळणे गरजेचे. देव नवसास पावेल.
धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
मनाविरुद्ध क्षुल्लक गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.
मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. पत्नीच्या लहरी सांभाळाल.
कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही नकारात्मक विचार मनात येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. व्यसनांपासून दूर राहा.
मीन : शुभ रंग : मारपंखी| अंक : ४
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान-मोठे आर्थिक लाभ होतील. विरोधकांचा विरोध मावळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.