आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
इतरांच्या भानगडीत न पडता फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करूनच कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करू शकाल.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
पत-प्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयांत तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. यशदायी दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात धनलाभ.
मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. तुमच्या कामातील उत्साहाने सहकारी प्रभावित होतील.
कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.
सिंह : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून मृगजळामागे धावणे योग्य ठरणार नाही.
कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ८
आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. अाज तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणार आहात.
तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
ध्येय साध्य करण्यासाठी काबाडकष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून राेजगार मिळेल.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना संधी मिळेल. रुग्णांना हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.
धनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मतभेद विसरून भावंडे एकत्र येतील. गृहसौख्याचा दिवस.
मकर : शुभ रंग : मरून| अंक : ५
महत्त्वाच्या चर्चेत इतरांची मते समजून घ्या. आपलेच खरे करण्याचा अट्टहास नको. दिवस थोडा दगदगीचा.
कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
सामाजिक कार्यात तुमचं योगदान द्याल. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवे उपक्रम बिनधास्त सुरू करा.
मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
योग्य माणसे संपर्कात येतील. अथक परिश्रमांच्या साहाय्याने यश दृष्टिक्षेपात येईल. प्रामाणिक प्रयत्नास यश शंभर टक्के मिळेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.