आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 17 जून 2020 रोजी अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 मधील 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे योग्य ठरेल. या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. व्यर्थ धावपळ आणि तणावाची स्थिती राहील. खर्च वाढेल तसेच हे लोक चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : ७

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. काही रखडलेल्या योजना आज सुरू करता येतील.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत.

मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : २

बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत.

कर्क :  शुभ रंग : निळा | अंक : ५

हट्टीपणास लगाम घालणे गरजेचे. इतरांचेही विचार ऐकून घ्या. आज महत्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका. 

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. वाद न घालता त्यांच्या वयाचा मान राखा.  

तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ४ 

आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. कायद्याची चौकट मोडू नका.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : ६

आज तुम्हाला एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. उत्साही दिवस.

धनू :  शुभ रंग : जांभळा  | अंक : ५

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून कामे करून घेतील. गृहीणी हसतमुख असतील. 

मकर : शुभ रंग : केशरी  | अंक : ८

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

अार्थिक बाजू उत्तम असेल. मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल. आज वाहन दुरूस्तीचा खर्च उद्भवू शकतो.

मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ९

काही कौटुंबिक प्रश्न  तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. 

0