आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 219 ऑगस्टचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : ५
योग्य वेळी घेतलेले निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. जागेसंबंधी व्यवहार मार्गी लागतील.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : १
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. सामाजिक कामे करणाऱ्यांना लोकांचा आदर मिळेल.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
पत-प्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. यशदायी दिवस.

कर्क : शुभ रंग : मरून|अंक : ८
हट्टीपणा सोडून आज थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. जोडीदारास दिलेले शब्द पाळावे लागतील.

सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
थोरामोठ्यांंच्या वयाचा मान राखावा लागेल. शब्द जपून वापरल्यास घराबाहेर वाद टाळता येतील.

कन्या : शुभ रंग : केशरी|अंक : ७
जुन्या मित्रांच्या भेटीने मन ताजेतवाने होईल. अनेक अवघड कामे सोपी होतील. दिवस लाभाचा आहे.

तूळ : शुभ रंग : हिरवा|अंक : ३
आपल्या कर्तृत्वास थोरांंचे आशीर्वाद लाभतील. गृहिणींना आज क्षणभरही उसंत मिळणे कठीण आहे.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपिशी|अंक : ४
कार्यक्षेत्रात ध्येये साध्य करायची असतील तर केवळ गप्पांपेक्षा अथक प्रयत्नास प्राधान्य गरजेचे राहील.

धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
वैवाहिक जीवनात वाद संभवतात, पण फार ताणून धरू नका. सासुरवाडीकडून काही लाभ संभवतो.

मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : २
इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे. प्रवासात खोळंबा होईल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. आज व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.

बातम्या आणखी आहेत...