आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 19 मे रोजी आश्लेषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ३
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५
महत्त्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास नको.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. प्रवास कंटाळवाणे होतील.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
तब्येत ठणठणीत राहील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

सिंह : शुभ रंग : मरून| अंक : ७
कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटतील.आज तुम्ही घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता जाणवणार नाही.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ९
प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरणार आहेत. आज मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३
मानसिक संतुलन बिघडेल काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ वाढेल. तब्येतीची काळजी घ्या

धनु : शुभ रंग : मोरपीशी | अंक : ५
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : २
तुमची सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक जिवनांत गोडवा.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरदार साहेबांचे मूड सांभाळतील. पत्नीला होच म्हणा.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : १
प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...