आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार 2 डिसेंबर रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष: शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
नव्या ओळखीतून व्यवसायवृध्दी होईल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क रहा.
वृषभ: शुभ रंग : राखाडी| अंक : १
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिध्दी मिळेल. आशादायी दिवस.
मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
अत्यंत उत्साहवर्धक दिवस. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल.
कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. हाती असलेले पैसे जपून वापरा.
सिंह :शुभ रंग : क्रिम| अंक : ९
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होईल. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडावे लागतील.
कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ८
उच्चशिक्षितांना विदेशगमनाचे वेध लागतील. महत्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होणार आहे.
तूळ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ३
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे आहे.
वृश्चिक : शुभ रंग : मोतिया|अंक : ६
व्यावसायात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर अडून राहू शकाल.
धनु : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
आज नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल.एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.
मकर : शुभ रंग : भगवा| अंक : १
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.
कुंभ : शुभ रंग :डाळिंबी|अंक : २
स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. नवे परिचय होतील. किमती खरेदी कराल.
मीन : शुभ रंग : केशरी|अंक : ५
महत्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. आनंदाच्या भरात कुणाला वचने देऊ नका.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.