आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी धनिष्ठा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : हिरवा| अंक : २
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. मासन्मानात वृध्दी होईल. उत्तम दिवस.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. नेतृत्व गुणांस वाव मिळेल. आज नोकरदारांना बढतीची चाहूल लागेल.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
नोकरीत कामाचा ताण वाढेल. तरूणांना घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. गृहीणी व्यस्त.

कर्क : शुभ रंग : केशरी| अंक : ३
घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकाऊ नका.

सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ८
आत्मविश्वास व मनोबलात वृध्दी होईल. महत्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर कलेले बरे.

कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : १
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. अडचणीच्या प्रसंगी मित्र धाऊन येतील.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
महत्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. सकाळी वजनदार असलेले खिसे आज संध्याकाळी रिकामे होतील.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही आर्थिक आवकही पुरेशी राहील.

मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
पारिवारिक समस्या सहज सुटल्याने आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.

मीन : शुभ रंग : मरून| अंक : ८
खर्चाचे प्रमाण वाढते असले तरी आवकही पुरेशी राहील. दूरचे प्रवास संभवतात. प्रवासात सतर्क रहा.

बातम्या आणखी आहेत...