आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 2 नोव्हेंबर 2022 रोजी शतभिषा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष | शुभ रंग : राखाडी, शुभ अंक : १
यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. व्यस्त दिवस.

वृषभ | शुभ रंग :मोतिया, शुभ अंक : ४
आज घरात वडिलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल. ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे वळतील.

मिथुन | शुभ रंग :आकाशी, शुभ अंक : १
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हितश़त्रू टपूनच बसलेत, सतर्क राहा.

कर्क | शुभ रंग पिस्ता, शुभ अंक : ९
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडीगुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

सिंह | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

कन्या | शुभ रंग:निळा, शुभ अंक : २
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

तूळ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३
जमीन खरेदी-विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृश्चिक | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ५
आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

धनू | शुभ रंग: भगवा शुभ अंक : ८
आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात, फार अर्जंट नसतील तर टाळा.

मकर | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ६
कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरी पडू शकेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील.

कुंभ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ९
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

मीन | शुभ रंग :आकाशी, शुभ अंक : ७
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

बातम्या आणखी आहेत...