आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुकर्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 2 सप्टेंबर रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : निळा | अंक : १
उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.

वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : ३
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरुच राहील. नोकरदारांना वरीष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. व्यस्त दिवस.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २
नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज वरीष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ५
कार्यक्षेत्रातील बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रुसवे फुगवे असतील.

सिंह :शुभ रंग : राखाडी|अंक : ६
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढणार आहेत. पथ्यपाणी पाळा अन्यथा आजार बळावेल.

कन्या : शुभ रंग : मोतिया|अंक : ४
महत्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालू राहील. हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. कला, क्रिडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढववेत.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा|अंक : ८
जमिन जुमल्याच्या व्यवहारात सावध रहाणे गरजेचे. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

धनु : शुभ रंग : लाल | अंक : ७
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. पायपीट होईल.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ४
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. वादविवाद मात्र टाळा.

कुंभ : शुभ रंग : पिवळा | अंक : ९
रिकाम्या चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल. महत्वाची कामे दुर्लक्षित होतील. तब्येत नरमच राहील.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आज एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल. चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. आज बचत शक्य नाही.