आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्ल नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 29 जुलै 2020 रोजी विशाखा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३
चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमा-खर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : १
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ९
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

कन्या : शुभ रंग : नारिंगी| अंक : ७
वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मित्रांकडून प्रोत्साहन मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ३
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज आपल्या मतावर ठाम राहता येईल.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : १
नोकरीच्या ठिकाणी आज कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
नोकरीत वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आपल्या अडचणी देवालाच सांगा.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : २
गोडबोली माणसे भेटतील. नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. झटपट लाभाचा मोह टाळा.