आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सौभाग्य नावाच्या शुभ योगाच्या होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 20 मे रोजी अश्विनी नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर बुधवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

हट्टीपणावर मात करून आज संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल.

वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक-जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. थोरामोठ्यांंच्या वयाचा मान राखा.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.दिवस लाभाचा असून अनेक अवघड कामे सोपी होतील. काही भाग्यवान नव्या घराचा ताबा घेतील.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तृत्वास थोरामोठ्यांचे अाशीर्वाद लाभतील.

सिंह : शुभ रंग : अबोली | अंक : ५

कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य गरजेचे राहील.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ४

इतरांच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण, तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल.

वृश्चिक : शुभ रंग : पिवळा | अंक : ६

कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

जागेसंबंधीत महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ९

नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देणे कठीण जाईल. समाजकार्य कराल.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ७

पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकियात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. आज यशदायी दिवस. 

बातम्या आणखी आहेत...