आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 21 एप्रिल रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज श्रीरामनवमी साजरी केली जाईल. आजच्या ग्रहस्थितीचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
नव्या नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. तरुणांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ३
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस. मुलांचे हट्ट अानंदाने पुरवाल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
प्रवासात नवे हितसंबंध निर्माण होतील. आज तुम्ही इतरांच्या कामी याल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
लहान-मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. कौटुंबिक वाद असतील तर सुसंवादाने मिटू शकतील.

सिंह : शुभ रंग : मरून|अंक : ७
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
आपले म्हणणे इतरांना पटावे अशी अपेक्षा करूच नका. विरोधकांशी गोड बोलूनच स्वार्थ साधावा लागेल.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ६
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल.

धनू : शुभ रंग : केशरी|अंक : ३
मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल. उपासनेत खंड नको.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : २
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. अत्यंत अनुकूल दिवस.

मीन : शुभ रंग : पांढरा|अंक : ३
दैनंदिन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. क्षुल्लक वाटणारी दुखणीही अंगावर काढू नका.

बातम्या आणखी आहेत...