आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 ऑक्टोबर, बुधवारी बृहस्पती आणि चंद्र धनु राशीमध्ये राहतील. या 2 ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. जॉब आणि बिझनेसमधील अडचणी दूर होतील. कामाचे कौतुक होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : निळा| अंक : ३
घरात वडिलधारी मंडळी स्वत:चे खरे करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. प्रतिष्ठेची काळजी घ्या.

मिथुन : शुभ रंग : हिरवा|अंक : १
व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

कर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : २
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनसंपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ७
नवोदित कलाकारांना पूर्वीच्या उमेदवारीचे फळ मिळेल. भाग्यवान महिला मौल्यवान खरेदी करतील.

कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
आज प्रॉपर्टीविषयी काही व्यवहार मार्गी लागतील. प्रेम प्रकरणंत मात्र नसती आफत होईल, सांभाळा.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या ओळखी होतील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
आज आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना आज अचानक आलेल्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : ८
अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : १
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : २
यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्याही महत्त्वाकांक्षा वाढतील. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...