आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 23 डिसेंबर रोजी रेवती नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्यच नाही.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : २
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीबाबत काही आनंददायी घटना घडतील. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : हिरवा|अंक : ४
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : ३
कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक शांती आज सत्संगातूनच मिळेल.

सिंह : शुभ रंग : तांबडा|अंक : ६
कुणाकडून अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही. पत्नीच्या हो ला होच करा.

कन्या : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर खुश असेल. यशदायी दिवस.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे अहे.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. आज पत्नी आतुरतेने वाट बघत असेल, लवकर घरी जा.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
शिक्षणाशी निगडीत व्यवसाय तेजीत चालतील. आज कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावा लागणार आहे.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ६
ऑफिसच्या कामासाठी प्रवास घडू शकतील. आज काही प्रवासात होणाऱ्या ओळखी पुढे कामी येतील.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

मीन : शुभ रंग : आकाशी| अंक : ५
लहरी आणि हट्टी स्वभाव काब्ूत ठेवा. कार्यक्षेत्रात तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. इतरांचेही ऐकून घ्या.

बातम्या आणखी आहेत...