आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 23 फेब्रुवारी रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष लाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : डाळींबी| अंक : ६
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. आपल्याच माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे.

वृषभ : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळणे गरजेचे. देव नवसास पावेल.

मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. पत्नीच्या लहरी सांभाळाल.

सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही नकारात्मक विचार मनात येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. व्यसनांपासून दूर रहा.

कन्या : शुभ रंग : मारपंखी| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. विरोधकांचा विरोध मावळेल.

तूळ : शुभ रंग : भगवा| अंक : २
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर रहाल.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज. मुलांचे मस्तीचे प्रमाण वाढेल.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : १
व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आज तुम्ही कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. खर्च प्रमाणाबाहेर होईल.

मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अती धावपळ टाळा. आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यावर भर द्या. आज मित्र मोलाचे सल्ले देतील.

बातम्या आणखी आहेत...