आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 23 नोव्हेंबर रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:मरून शुभ अंक : ३
महत्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या दूपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त राम राम करा, कोणताही व्यवहार नको.

वृषभ | शुभ रंग:डाळींबी शुभ अंक : ९
धंद्यात येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. वैवाहीक जिवनांत आज दुपारनंतर सुसंवाद घडेल.

मिथुन | शुभ रंग: पिस्ता शुभ अंक : ५
आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

कर्क | शुभ रंग:गुलाबी शुभ अंक : ९
मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेमी युगुलांमध्ये सुसंवाद राहील. स्थावर शेती वाडी संबंधीत काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील.

सिंह | शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ८
काम कमी दगदग जास्त होईल. एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.

कन्या | शुभ रंग: हिरवा शुभ अंक : ६
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अती उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात जुळलेलेे नवे हितसंबंध भविष्य काळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

तूळ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधावा. आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील.

वृश्चिक | शुभ रंग: राखाडी, शुभ अंक : ५
तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले मनावर घेऊ नका.

धनु | शुभ रंग: मोतिया, शुभ अंक : ३
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासूनच्या काही ईच्छा पूर्ण होतील. वाहन, वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. म्हणाल ती पूर्व कराल.

मकर | शुभ रंग:लाल, शुभ अंक : १
उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनूकुल दिवस असून नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कुंभ | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ४
पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

मीन | शुभ रंग: मोरपिशी, शुभ अंक : २
आज दिवसाचा पूर्वार्ध मोठया अार्थिक व्यवहारासाठी तितकासा अनुकूल नाही. दुपारनंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. घरात वडीलधाऱ्यांची मने जपाल.

बातम्या आणखी आहेत...