आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 24 फेब्रुवारी रोजी पुनर्वसू नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर बुधवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. भावंडांमध्ये सामंजस्य राहील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

कर्क : शुभ रंग : लाल| अंक : १
अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

सिंह : शुभ रंग : आकाशी|अंक : २
दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
आज रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. कायद्याचे पालन गरजेचे राहील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
धंद्यात आवाक्याबाहेर गुंतवणूक नको. कष्टांच्या प्रमाणात मोबदला जेमतेम राहील. वरिष्ठांच्या आज्ञेत राहावे.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा| अंक : ५
चर्चेत इतरांची मते समजून घ्यावीत. आपलेच खरे करण्याचा अट्टहास नको. आर्थिक धाडस नकोच.

धनू : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
समाजात व मित्रमंडळीत मानमरातब वाढेल. एखाद्या सामाजिक कार्यात तुमचं योगदान द्याल. छान दिवस.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ६
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. प्रामाणिक प्रयत्नास यश निश्चित.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
हौशी मंडळींना जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल.

मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : ९
व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवे उपक्रम सुरू करता येतील. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील

बातम्या आणखी आहेत...