आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 24 जून रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे बुधवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. संयम बाळगावा. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ४

आज घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. गृहिणींचे गृहोद्योग तेजीत चालणार आहेत.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १

जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने घरगुती अडचणी सहज सोडवता येतील. हट्टीपणास लगाम घालून. इतरांचेही विचार ऐकून घ्या.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील. कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी आज वेळ काढावा लागेल.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

आज तुम्ही अत्यंत आनंदी व उत्साही असाल. एखाद्या नवीन क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

अार्थिक बाजू उत्तम असल्याने मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल. आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील.

कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ६

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल.

तूळ : शुभ रंग : हिरवा | अंक : ८

आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. रिकामटेकड्या गप्पांपेक्षा आज प्रत्यक्ष कृतीवर भर देणे गरजेचे राहील.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ५

आज घरातील थोरांचे विचार समजून घ्यावे लागतील. अाध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. वाहन चालवताना गाणे गुणगुणू नका. सुरक्षेस प्राधान्य द्या.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : ९

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यवसायात स्पर्धा तीव्र होणार आहे. पत्नीशी एकमत.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४

वैवाहिक जीवनातील मतभेद दुपारनंतर निवळतील. आज तब्येत मात्र जरा नरमच राहील. काळजी घ्या.

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

बातम्या आणखी आहेत...