आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार 24 मार्च रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : २
मनाजोगत्या घटनांनी मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. इतरास मदत करू शकाल.
वृषभ : शुभ रंग : भगवा| अंक : ३
आज विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज झालेले प्रवास सुखकारक होतील.
मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आवडत्या क्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. आज सहकुटुंब चैन करणार आहात.
कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
आज आधुनिक रहाणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.
सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ४
जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. प्रवास होतील.
कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ६
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी उपलब्ध होतील.
तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
आज अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.
वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
कार्यक्षेत्रात राजकारणाचा सामना करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.
धनू : शुभ रंग : आकाशी|अंक : ३
कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच करा.
मकर : शुभ रंग : भगवा|अंक: ७
आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. पत्नीस दिलेली वचने पाळाल.
कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. येणी वसूल होतील.
मीन : शुभ रंग : निळा| अंक : १
व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढशास्त्रांकडे कल वाढेल.खेळाडू स्पर्धा जिंकतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.