आज गुढीपाडवा : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

  • आजपासून होत आहे हिंदू नववर्षाची सुरुवात

रिलिजन डेस्क

Mar 25,2020 12:20:00 AM IST

बुधवार, 25 मार्च 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. आज रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. यासोबतच आज नववर्षाची सुरुवात आहे. आजच्या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • मेष: शुभ रंग : पांढरा| अंक : ७

आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा.

  • वृषभ: शुभ रंग : पिवळा | अंक : ५

वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे करु शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.

  • मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ९

नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

  • कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.

  • सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८

आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.

  • कन्या : शुभ रंग : मरून | अंक : ६

मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.

  • तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.

  • वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : १

काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

  • धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.

  • मकर : शुभ रंग : लाल | अंक : ४

संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. आज भावंडात सामंजस्य राहील.

  • कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

कार्यक्षेत्रात मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

  • मीन : शुभ रंग : अबोली | अंक : ६

मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी सामंजस्य राहील.

X