आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 25 नोव्हेंबर रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सिद्धी नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : १
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. आवाक्याबाहेर जाणाऱ्या खर्चास लगाम गरजेचा आहे.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : २
आज अत्यंत उत्साही व आनंदी असा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहविषयक बोलणी करायची असतील तर आजचा दिवस अगदी योग्य.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी स्वत:चे महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
महत्त्वाचे निर्णय घेताना मनाची ओढाताण होणार आहे. आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : २
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्या.

कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

तूळ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ३
हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ६
मित्रांमध्ये माेठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च कराल. मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावे लागतील.

धनु : शुभ रंग : भगवा|अंक : ५
स्थावरा विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ओळखी होतील. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहा.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
आज विविध मार्गाने लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील.आशादायी दिवस.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. काही साधे निर्णय घ्यायलाही वेळ लागेल.पत्नी म्हणेल त्याला हो म्हणा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser