आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे

बुधवार 27 मे 2020 रोजी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. पुनर्वसू नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : १

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.

वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ४

ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : २

तुमचे मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. वाद टाळा.

कन्या : शुभ रंग : लाल | अंक : ९

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. दिवस लाभाचा.

तूळ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ७

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. थोरांचे हट्ट पुरवावे लागतील.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ८

कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढणार आहेत.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ६

हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. आज मानसिक शांती सत्संगातून मिळणार आहे.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : ८

घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

तुम्हाला काही मान अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. आज जोडीदाराकडूनही फार अपेक्षा नकोत.

मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ४

नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. कलाकार असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण बरे होतील.

बातम्या आणखी आहेत...