आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 28 जुलै रोजी पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
पैसा येण्याइतकेच जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. आज प्रतिष्ठेस जपावे.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ८
आज हातचे सोडून पळत्यामागे धावण्याचा मोह होईल. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजून चालणार नाही.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. तुमची भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : १
आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहीणींनी आज झाकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : राखाडी|अंक : ८
कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

कन्या : शुभ रंग : केशरी|अंक : ७
विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. आज तुमचे विचार प्रगल्भ होतील.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
आज तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नि:स्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : २
कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होतील. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागूच नका.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमंडळींत माेठेपणा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...