आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 28 ऑक्टोबर रोजी पूर्व भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
स्वार्थाकडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ५
आत्मविश्वासाने नव्या योजना राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.नवीन लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

सिंह :शुभ रंग : चंदेरी| अंक : २
काही अति हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा.

कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : १
हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. चंगळवादी वृत्ती राहील.आज दोघात तिसरा नको.

तूळ : शुभ रंग : नारिंगी|अंक : ६
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ८
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल. काही गुपिते उघड होतील.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ९
अाज अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
नकळत झालेल्या चुकांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

मीन : शुभ रंग : क्रिम|अंक : ९
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य द्या.