आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 3 ऑगस्टला हस्त नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. बुधवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : निळा | अंक : ८
आज कार्यक्षेत्रात यश दृष्टीक्षेपात येण्यासाठी परिश्रम वाढवावेच लागतील. तब्येतीची हेळसांड करू नका.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकाऊ नका.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
महत्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. मुलांना दिलेले शब्द पाळता येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

सिंह : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची आवकही पुरेशी राहील.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
पारिवारिक समस्या सहज सुटल्याने आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.

तूळ : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.

वृश्चिक : शुभ रंग : मरून| अंक : ८
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील.आज प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.

धनु : शुभ रंग : हिरवा| अंक : २
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. मासन्मानात वृध्दी होईल. उत्तम दिवस.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. नोकरीत वरीष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. मित्र विश्वासघात करतील.

कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
नोकरीत कामाचा ताण वाढेल. तरूणांना घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. गृहीणी व्यस्त.

मीन : शुभ रंग : केशरी| अंक : ३
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. अडचणीच्या प्रसंगी मित्र धाऊन येतील.

बातम्या आणखी आहेत...