आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 3 फेब्रुवारी रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज एखाद्या विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. स्पर्धकांना कमजोर समजू नका.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १
घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ९
व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
आज तुमचाऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा.

कन्या : शुभ रंग : निळा | अंक : २
आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ५
अती स्पष्टवक्तेपणा मुळे आज आपलीच काही माणसे दुरावतील. जरा डोके थंड व वाणीत गोडवा ठेऊनच विरोधकांनाही आपलेसे करून घेता येईल. संयम ठेवा.

धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून काही अपूऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. काही दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. आशादायी दिवस.

कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : १
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही देणी द्यावी लागतील.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
नोकरीत वरीष्ठ तुमच्या अडचणी विचारात घेतील. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...