आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात
Advertisement
Advertisement

बुधवार, 3 जून रोजी स्वाती नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ४

व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत आज खेळीमेळीचे वातावरण राहील.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : १

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे. 

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ८

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.

कर्क :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. प्रेमप्रकरणे मात्र डोक्याला नसता ताप देतील.

सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ७

आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास होतील.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९

पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस. घरात पाहुण्यांची येजा राहील. वैवाहीक संबंधात गोडवा   राहील.

तूळ : शुभ रंग : आकाशी  | अंक : ६

सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा. 

वृश्चिक : शुभ रंग : लाल  | अंक : ५

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.

धनू :  शुभ रंग : क्रिम| अंक : २

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. आज जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४

नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

आज घरातील  वडीलधारी मंडळी  हट्टीपणाने वगतील. कामधंद्यात काही अनपेक्षित अडचणी  येण्याची शक्यता.

मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ३

मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल.

Advertisement
0