आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 3 मार्च रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. आनंदी दिवस.

वृषभ : शुभ रंग : लाल| अंक : ३
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढतील.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : २
चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील. गृहिणी घरसजावटीचे मनावर घेतील.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी दिवस योग्य आहे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ४
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

कन्या : शुभ रंग : क्रिम|अंक : ७
अति धावपळ टाळा. अनेक किचकट कामे सोपी होणार आहेत. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
आज तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवणारी काही मंडळी भेटतील. योग्य निर्णय घेणे अवघड जाईल.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दुरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.

धनू : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहूणे घरी पायधूळ झाडणार आहेत.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. अधिकारांचा गैरवापर टाळाच.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहावे.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : १
हितशत्रू सक्रिय असल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत.

बातम्या आणखी आहेत...