आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. बुधवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
नोकरीच्या ठीकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. साहेबांना आज गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला होकार मिळू शकेल.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागेल.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
कार्यालयिन कामासाठी प्रवास घडतील. आज अपेक्षित मेल्स येतील. प्रापर्टी विषयक व्यवहार आज नकोत.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, तुम्ही लक्षच देऊ नका.

कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
नोकरी धंद्याच्या ठीकाणी अहंकारास थारा देऊ नका. मृदु वाणीनेच अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
आज घरात थोरांशी मतभेद संभवतात,फार ताणू नका.दूरच्या प्रवासात आज मौल्यवान ऐवज सांभाळा.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : १
नोकरीधंद्यात अनुकूलता वाढेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. काही अपेक्षित लाभ होतील.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ५
उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला असेल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांची कृपा राहील.

मकर : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तराही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज दैवाची साथ निश्चित.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
आज तुम्ही आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठया आर्थिक उलाढाली आज टाळा.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. आज आशादायी दिवस.

बातम्या आणखी आहेत...