आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 30 जून रोजी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे बुधवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
आवक मनाजोगती असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकललेली बरी.शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ५
लहरी आणि हट्टी स्वभाव काब्ूत ठेवा. कार्यक्षेत्रात तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे ऐका.

तूळ : शुभ रंग : पिवळा | अंक : ६
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल. वरिष्ठांच्या कतुकास पात्र व्हाल. यशदायी दिवस.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ८
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध राहायला हवे. शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.

मीन : शुभ रंग : तांबडा| अंक : ९
कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...