आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 30 मार्च रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती शुभ नावाचा योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
कौटुंबिक सदस्यांमधे सुसंवाद राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील आज दिवस उत्तम आहे.

वृषभ : शुभ रंग : लाल| अंक : ६
आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
आज कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. झटपट लाभाचा मोह टाळणे गरजेचे आहे. सतर्क रहा.

सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
दुकनातील गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

कन्या : शुभ रंग : केशरी| अंक : ६
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधा.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना संधी येतील.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपीशी| अंक : ४
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : २
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

बातम्या आणखी आहेत...