आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 30 सप्टेंबर रोजी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे पद्म नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैक्री 7 राशीच्या लोकांसाठी महिन्यातील शेवटचा दिवस खास राहील. आर्थिक व्यहवारात या नशिबाची साथ मिळेल. अडकलेला पैसे मिळेल. जॉब आणि बिझनेसमध्ये वरिष्ठांची मदत मिळेल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. दिवस लाभाचा.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल. यशदायी दिवस.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही.मानसिक शांतीसाठी सत्संगाकडे पाय वळवाल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
कुणाकडून अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही. नोकरीत बिनचूक कामास प्राधान्य द्या.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणास वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर खुश असेल. वाणीत मृदुता ठेवा.

कन्या : शुभ रंग : मरून|अंक : ८
आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे राहील.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : पिस्ता|अंक : १
आज काम उरकून लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा.जोडीदार आतुरतेने वाट बघत असेल. आनंदी दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७
शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.

धनू : शुभ रंग : नारिंगी| अंक : २
प्रवासात होणाऱ्या काही ओळखी भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतील. घराबाहेर वाद संभवतात.

मकर : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
लहरी आणि हट्टी स्वभाव काबूत ठेवा. तुमची मते पटतीलच असे नाही. सामंजस्य ठेवावे लागेल.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : ३
असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे.