आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 31 मार्च रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
आज काही सज्जनांचा सहवास लाभेल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ६
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आजच्या कष्टांचे फळ आज नाही तरी उद्या नक्कीच मिळेल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.आज कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ८
आज कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ४
आज एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी आज झाकली मूठ झाकलीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ३
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
मन चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह होईल.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी|अंक : २
पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त अाहेत. छंदी फंदी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : १
आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. आज कायदा मोडू नका.

कुंभ : शुभ रंग : जांभळा|अंक : ९
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घ्या.

मीन : शुभ रंग : सोनेरी|अंक : ८
भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

बातम्या आणखी आहेत...