आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 4 नोव्हेंबर 2020 ला मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे परीघ आणि शिवा नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. परीघ योगाचा प्रभाव सकाळी 6 वाजून 49 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानांतर शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : १
कौटुंबिक सदस्य सामंजस्याने वागतील. वास्तु किंवा वाहन खरेदीची स्वप्ने साकार होतील. अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस सत्कारणी लावाल.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : २
कंजूषपणा सोडावा लागेल. आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्जहप्ते फेडावे लागणार आहेत. बेरोजगारांची भटकंती चालूच राहणार आहे.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ७
रिकाम्या गप्पांत वेळ न दवडता आज तुम्हाला कृतीस प्राधान्य द्यावे लागणार आहे. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचे दडपण येईल. दैव तुमच्या बाजूने आहे.

कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : २
उच्चपदस्थांच्या जबाबदाऱ्या व अधिकार वाढणार आहेत. आज अत्यंत व्यस्त दिवस असून व्यवसायात चढाओढीचा सामना करण्यासाठी सज्ज राहवे लागेल.

सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ३
वादविवादात समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा हुषार असूही शकते याचे भान असूद्या. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे आज गरजेचे. पत्नीस दिलेली वचने पाळणे हिताचे.

कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : २
काही मनाविरूध्द घटना घडल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कर्जमंजूरीची कामे लांबतील. कायद्यात रहाल तरच फयद्यात रहाल.

तूळ: शुभ रंग : मोतिया | अंक : ४
घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज जास्तीत जास्त वेळ घालवाल. खेळाडू व कलाकार मंडळींना चाहत्यांचे प्रेम लाभेल.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्वाकांक्षांना आवर घालून थोडे विश्रांतीस प्राधान्य देणेही गरजेचे आहे. काही येणी वसूल होतील.

धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आज दैनंदीन कामातही अडथळे संभवतात. घरात पुरेसा वेळ न दिल्याने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शेजारी आपलेपणाने वागतील. व्यस्त दिवस.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
दैनंदीन कामे आज सुरळीत पार पडतील. आज काही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. गृहीणींनी गप्पा आवरत्या घ्याव्यात कारण त्यातूनच गैरसमज होतील.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७
मनाच्या चंचलतेस लगाम अवश्यक आहे. सडेतोड वृत्तीमुळे काही आपलीच माणसे दुरावण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काहीतरी हरवलेले गवसेल.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
खिशात वजन असल्याने मित्रमंडळीतही तुमच्या शब्दाला वजन असेल. भावनेच्या भरात कुणाला अश्वासने देणे टाळा. आज वक्ते सभा गाजवतील.