आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 5 ऑगस्ट 2020 ला धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : ८
यशस्वी व्यक्तींच्या सहवासात महत्वाकांक्षा वाढतील. आज आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.
मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १
कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हताळाल. प्रामाणिक मेहनतीस नशिबाची साथ मिळणार आहे. आज सज्जनांचा सहवास लाभेल.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका.

सिंह : शुभ रंग : केशरी| अंक : ७
आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत.

कन्या : शुभ रंग : राखाडी|अंक : ८
खाण्यापिण्यावर नियंत्रण असणे गरजेचे राहील. आज काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : २
कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. आज गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

धनू : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. गरजूंस मदत कराल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आज तुमचा स्वत:चेच खरे करण्याकडे कल राहील. तुमच्याकडून काही आपलीच माणसे दुखावली जातील.

मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
आज काही दूरचे नातलग संपर्कात येणार आहेत. मोठेपणा जपण्यासाठी खर्च करावा लागेल. थोरा मोठयांची मने जपाल.

बातम्या आणखी आहेत...