आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार, 5 जानेवारीला 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी पूर्व श्रवण नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. वरीष्ठांची मर्जी सांभाळाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.
वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल. आज अारोग्यास जपा.
मिथुन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.
कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
उद्योग व्यवसायात चढाओढ वाढेल. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.
सिंह : शुभ रंग : केशरी| अंक : ६
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास करून चालणार नाही. आज विरोधकांशी सामंजस्याने घ्यावे.
कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठीतांचे सहवास लाभदायक ठरतील.
तूळ : शुभ रंग : मोरपीशी| अंक : ४
लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. कौटुंबिक वाद असतील तर सुसंवादाने मिटू शकतील.
वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : २
प्रवासात नवे हितसंबंध निर्माण होतील. घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल. गरजूस मदत कराल.
धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.
मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : १
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज अत्यंत अनुकूल दिवस.
कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. महत्वाची मेल्स येतील.
मीन : शुभ रंग : लाल| अंक : ६
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.