आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 6 एप्रिल रोजी रोहिणी नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे बुधवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : १
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. प्रवास कंटाळवाणे होतील.

वृषभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ७
आज तब्येत ठणठणीत राहील. विरोधकांचा जोर कमी होईल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटतील आज तुम्ही घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
आज प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ५
प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरणार आहेत. आज तुम्ही एखाद्या मित्रांच्या मदतीस धाऊन जाल.

कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९
आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतील. सत्संगाने मानसिक बळ वाढणार आहे.

तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ६
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
आज तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. वैवाहिक जिवनातील गोडवा वाढणार आहे.

धनु : शुभ रंग : जांभळा| अंक : २
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. पत्नीचे मूड जपा.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. मुले आज्ञेत असतील.

कुंभ : शुभ रंग : हिरवा| अंक : १
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
महत्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होतील. आज प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

बातम्या आणखी आहेत...