आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार 6 जानेवारी रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार..
मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
आज फक्त नाकासमोर चालावे असा दिवस. इतरांच्या भानगडीत न डोकावता आज फक्त आपल्या कामाशी कर्तव्य ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या झटकून टाका.
वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.कितीही राबलात तरी आज वरीष्ठांचे समाधान होणे कठीण.वडीलधाऱ्या माणसांची मने सांभाळावी लागतील.
मिथुन : शुभ रंग : तांबूस | अंक : १
दुखणी आंगावर काढू नका. काही जुने आजार दार ठोठावण्याची शक्यता आहे. क्षुल्लक गोष्टीवरून आज मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.
कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
कार्यक्षेत्रात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने योग्य व्यक्ती संपर्कात येतील.विवाह विषयक बोलणी सकारात्ककपणे पार पडतील.
सिंह : शुभ रंग : मरून| अंक : २
प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. गर्भवतींनी तब्येतीची काळजी घ्यावी.
कन्या : शुभ रंग : पिवळा| अंक : ४
आज तुम्हाला आपला एखादा छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. काही रसिक मंडळी तर काम साेडून छंदास प्राधान्य देतील. तरूणांच्या मनात प्रेमांकूर फुलतील.
तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे गरजेचे आहे. गृहीणींना माहेरची ओढ लागेल.
धनू : शुभ रंग : राखाडी| अंक : ७
आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.
मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल.
कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार टाळून हितसंबंध जपणे गरजेचे आहे.
मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९
व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.