आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 6 ऑक्टोबर रोजी हस्त नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ९
कार्यक्षेत्रात विरोधकांचा व हितशत्रूंचा सामना करावा लागणार आहे. आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका. काही जुने आजारही दार ठोठावतील.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : १
घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा.

कन्या : शुभ रंग : नारिंगी | अंक : २
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळीं बरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या वाहनाच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत.

धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ८
आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७
पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : ६
आर्थिक बाजू उत्तम असेल. आज घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल.वाहनाचीही काळजी घ्यावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...