आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार 7 एप्रिल रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष: शुभ रंग : डाळिंबी| अंक : २.
व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आज दिवस योग्य आहे.
वृषभ: शुभ रंग : राखाडी| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी देवालाच सांगा.
मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.
कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. आनंदी दिवस.
सिंह :शुभ रंग : पांढरा| अंक : ७
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.
कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी कही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : शुभ रंग : मोरपिशी|अंक : ५
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता|अंक : ६
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. घरमालकांशी वाद होतील.
धनू : शुभ रंग : नारिंगी| अंक : ३
सामाजिक कार्यकर्त्यांना आदर मिळेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.
मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.
कुंभ : शुभ रंग : चंदेरी|अंक : ९
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.
मीन : शुभ रंग : मरून|अंक : १
वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.