आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 8 जून रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. व्यस्त दिवस.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ९
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.आज कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य.

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आज एखादी गुप्त बातमी समजेल. गृहीणींनी तर आज झकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ३
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. आज भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

कन्या : शुभ रंग : लाल | अंक : १
मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. आज विरोधकांना कमजोर समजू नये.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल. अनपेक्षित लाभ होतील.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : ५
आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येतील. आज मित्रांच्या नादी लागूच नका.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. आज कोणतेही धाडस टळा.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होतील. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. विचार प्रगल्भ होतील.

बातम्या आणखी आहेत...