आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी चंद्र वृषभ राशीमध्ये राहुसोबत राहील. यावर केतूचीही दृष्टी पडत आहे. यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहणे आवश्यक आहे. जॉब आणि बिझनेसच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. दिवसभर तणाव राहील. काही कामामध्ये नुकसान होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
व्यापारी वर्गास अत्यंत लाभदायी दिवस आहे. काही जुनी येणी अाज वसूल होण्याची शक्यता आहे.

वृषभ: शुभ रंग : भगवा| अंक : ३
एखाद्या कौटुंबिक समारंभात उपस्थित राहाल. नव्या ओळखी व्यापारवृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. विवाहेच्छुकांना जीवनसाथीचा लाभ होईल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक :१
आज तुमची अत्यंत व्यग्र दिनचर्या राहील. एखादा पत्ता शोधण्यासाठी पायपीट होईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. तरुणांनी गैरवर्तन टाळावे.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. तुमची लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहणार आहे.

सिंह :शुभ रंग : राखाडी|अंक : ४
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. व्यग्र दिवस.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : २
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. आप्तस्वकीय, शब्दास मान राहील.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : केशरी| अंक : ८
फक्त स्वत:चा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. प्रतिकूल दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ३
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
चर्चेत फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. गोड बोलून स्वार्थ साधणे योग्य राहील.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी बढती-बदलीच्या बातम्या येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे तास वाढवावेत.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ७
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
अति हुशार माणसे संपर्कात येतील. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील.

बातम्या आणखी आहेत...