आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत राहील शुक्र:तूळ आणि धनुसहित 7 राशींना धनलाभ होण्याचे योग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

31 ऑगस्टपासून शुक्र आपली राशी बदलून सिंह राशीत आला आहे. येथे 25 दिवस राहून कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषांचे म्हणणे आहे की, शुक्राचे सूर्यासोबत एकाच राशीत असणे हे मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. आता या दोन ग्रहांच्या युतीमुळे देशात आणि जगात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.

हा राशी बदल अनेक लोकांसाठी चांगला राहील. कलेशी संबंधित लोक उत्साही राहतील. ग्लॅमर आणि फॅशनशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर असेल. देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. बाजारात खरेदी आणि गुंतवणूक वाढेल. पण महागाई कमी होणार नाही. राजकारणात मोठे बदल आणि परस्पर वाद होतील. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, सिंह राशीत शुक्राचे आगमन काही लोकांसाठी आनंददायी आणि फलदायी असेल. सिंह ही अग्नि तत्वाची राशी आहे आणि शुक्र हा रसप्रधान ग्रह आहे. जो भौतिक सुख-समृद्धीचा ग्रह आहे. त्याचा प्रभाव कृषी, कला, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौंदर्य प्रसाधने या क्षेत्राशी निगडित असलेल्यांना फायदा होईल.

तूळ आणि धनुसह सात राशींसाठी शुभ
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना शुक्राच्या बदलामुळे चांगला काळ जाईल. या 7 राशींच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना फायदा होऊ शकतो. कामाचे कौतुक होईल आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नशिबाची साथ मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल.

मकर आणि कन्या राशीसाठी संमिश्र काळ
सूर्य राशीत शुक्राच्या आगमनामुळे मकर आणि कन्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र काळ राहील. या राशीच्या लोकांचे आरोग्य सुधारेल पण दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो. पैसे खर्च होऊ शकतात. वैवाहिक सुख कमी होऊ शकते. भागीदारीच्या प्रकरणांमध्ये गोंधळ होऊ शकतो. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील.

वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीसाठी अशुभ
शुक्र राशीच्या बदलामुळे वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. या राशीच्या लोकांसाठी अनावश्यक खर्च वाढू शकतो. वैवाहिक सुख कमी होऊ शकते. गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात. मेहनत वाढेल. विरुद्ध लिंगाशी संबंध बिघडू शकतात.

बातम्या आणखी आहेत...