आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लेसन्स फ्रॉम ग्रेट थिकर्स:रागात कोणतेही काम करू नका, कारण जे करताल ते चुकीचेच हाेईल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीवनात चांगला मित्र मिळणे ही मोठी श्रीमंती आहे आणि तो टिकून राहणे हा आशीर्वाद

बल्तासार ग्रासियन
स्पॅनिश गद्य लेखक व प्रसिद्ध तत्वज्ञ होते. बेलमॉन्टे. स्पेनमध्ये त्यांचा जन्म झाला.
1. स्वत:ला कोणाकडेही सुपूर्द करू नका कारण गुलामी होय. आभार आणि प्रतिद्धतेपासून स्वत:ला दूरच ठेवा. अशा प्रकारे तुमच्यावर कोणीही अधिकार गाजवू शकणार नाही.

2. कोणाची सेवा करायची असेल तर त्याला स्वत:चीच मदत करायला शिकवा.

3. रागात कोणतेही काम करू नका. कारण तेव्हा चुकीचे काम करत असता.

4. कारणे शोधायला शिका. शहाणे लोक अशा प्रकारे संकटावर मात करतात.

5. दोस्ती जीवनात सुख वाढविते आणि दु:ख कमी करते.

6. जीवनात चांगला मित्र मिळणे ही मोठी श्रीमंती आहे आणि तो टिकून राहणे हा आशीर्वाद आहे.

7. कोणत्याही वादात चुकीची बाजू एवढ्यासाठी घेऊ नका, कारण तुमच्या विरोधकाने बरोबर बाजू घेतली आहे.

8 अशा प्रकारे काम करा की, तुमच्यावर कोणी लक्ष ठेवून आहे.

9. कोणतेही काम करताना त्यात चिमूटभर साहस जरूर असावे.