आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • September 1st Is Rishi Panchami: The Season Of Worshiping The Seven Sages: Know Who The Seven Sages Are And Special Facts About Them

1 सप्टेंबरला आहे ऋषी पंचमी:सात ऋषींची पूजा करण्याचा पूण्यकाळ: जाणून घ्या कोण आहेत हे सप्तऋषी आणि त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 1 सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल पंचमी आहे. या दिवशी ऋषीपंचमीचे व्रत पाळले जाते. ऋषीपंचमीच्या व्रतामुळे उपासना करताना किंवा व्रत-वैकल्ये करताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झालेल्या चुकांचे दोष दूर होत होतात.

ऋषी पंचमीच्या संदर्भात उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा सांगतात की, हे व्रत महिलांसोबत पुरुषवर्गही करू शकतात. पूजा आणि उपवास करताना अनेक वेळा आपल्याकडून कळत नकळत चुका या होत असतात.

या झालेल्या चुकांमुळे दोष निर्माण होतात आणि हे दोष दूर करण्यासाठी वर्षातून एकदा ऋषीपंचमीला सात ऋषींची पूजा करून त्यांच्यासाठी हा उपवास, हे व्रत केले जाते.

मत्स्य अवताराच्या कथांमध्ये सप्तऋषींचा उल्लेख आढळतो.

भगवान विष्णूचे दहा अवतार आहेत. पहिला अवतार म्हणजे मत्स्य. विष्णूने मत्स्य अवतार घेतला, त्यावेळी पृथ्वीवर महापूर आला होता. मत्स्य अवताराच्या रूपात भगवान विष्णूंनी राजा मनू आणि सप्तऋषींना एका नावेत बसवून या सर्व सप्तर्षींना वाचवले.

सप्तऋषींमध्ये कश्यपऋषी, अत्रीऋषी, भारद्वाजऋषी, ऋषी विश्वामित्र, ऋषी गौतम, ऋषी जमदग्नी, ऋषी वसिष्ठ यांचा समावेश होता. त्यांच्या केवळ नामस्मरणाने आपल्या कडून झालेल्या कळत नकळत चुकांचे दोष दूर होतात.

जाणून घ्या या सप्त ऋषींशी संबंधित खास गोष्टी...

कश्यप ऋषी- यांना 17 बायका होत्या. अदिती नावाच्या पत्नीपासून सर्व देवांचा जन्म झाला आणि दिती नावाच्या पत्नीपासून राक्षसांचा जन्म झाला. कद्रूपासून नाग आणि विनतापासून गरुडदेवाचा जन्म झाला. इतर पत्नींपासूनही वेगवेगळे प्राणी जन्मास आले

अत्रि ऋषी - रामायणानुसार श्री राम, लक्ष्मण आणि सीता हे देखील वनवासात अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले होते. अत्रि मुनींची पत्नी अनुसूया होती. भगवान दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र आहेत.

भारद्वाज ऋषी - भारद्वाज ऋषींनी आयुर्वेद ग्रंथाची रचना केली होती. तर द्वापार युगात द्रोणाचार्यांचा जन्म भारद्वाजऋषींच्या घरी पुत्र म्हणून झाला.

विश्वामित्र ऋषी - विश्वामित्र मुनीशी संबंधित अनेक कथा आहेत. त्यांच्या कथा सत्ययुगातील राजा हरिश्चंद्र, त्रेतायुगातील श्री राम-लक्ष्मण यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी गायत्री मंत्राची रचना केली.

गौतम ऋषी - गौतम ऋषींची पत्नी अहिल्या होती. गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या पाषाण झाल्या होत्या. श्रीरामांनी अहिल्येवर दया केली आणि दगडातून त्यांना पुन्हा मानव बनवले.

जमदग्नी ऋषी - जमदग्नीची पत्नी रेणुका होती. या दोघांचे पुत्र भगवान परशुराम होते. रामायण आणि महाभारतातही परशुरामाचा उल्लेख आहे आणि त्यांचा अष्टचिंजीवांमध्ये समावेश आहे.

वसिष्ठ ऋषी - रामायणानुसार श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना सुरुवातीचे शिक्षण वशिष्ठ मुनींनी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...