आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Treasury Secret Of Padmanabhaswamy Temple, But For Trajan Hunters, The Treasure Of The Vijayanagara Empire's 2500 Tons Of Gold Is Much Bigger

मंदिरातील खजिना:पद्मनाभ मंदिरातील खजिना एक लाख कोटींचा; पण ट्रेझर हंटर्स विजय नगर साम्राज्याचा 2500 टन सोन्याच्या खजिनाच्या शोधात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ ते कर्नाटकपर्यंत अशी बरीच मंदिरे आहेत जिथे लोक अजूनही खजिन्यांच्या शोधात येतात
  • दरवर्षी शेकडो लोक ट्रेझर हंटिंगमध्ये पकडले जातात, हंपीमध्ये बरीच स्मारके खोदली गेली आहेत

सुप्रीम कोर्टाने नुकतेच केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर राजघराण्याकडे सोपविले आहे. पद्मनाभस्वामी मंदिरातील सातवे तळघर उघडले जाणार नाही असा निर्णय राज परिवाराने घेतला आहे. यावरून या तळघरात किती रहस्ये आहेत, ती सर्व आता रहस्ये राहतील.

जवळपास एक लाख कोटींची संपत्ती असलेले पद्मनाभस्वामी मंदिर आपल्या खजिन्यासाठी चर्चेत असणारे एकवेम मंदीर नाही. केरळपासून कर्नाटकपर्यंत अशी अनेक मंदिरे आहेत जी आपल्या खजिन्यासाठई नेहमीच चर्चेत आहेत. 

विजयनगर साम्राज्याच्या खजिन्याचा सर्वाधिक शोध सुरू आहे. कर्नाटकातील हंपीपासून तेंलगाणाच्या हैदराबादपर्यंतच्या जंगलात या खजिन्याचा शोध घेताल जात आहे. अशी अशी आख्यायिका आहे की, परकीय आक्रमणकर्त्यांपासून वाचवण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी सुमारे 2500 टन सोन्याचा खजिना कुठेतरी लपविला होता.

दक्षिण भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक अजूनही मोठ्या खजिन्याच्या शोधात आहेत 

हैदराबादच्या डोंगरात विजयनगरचा खजिना 

हैदराबादजवळ श्रीशैलम् डोंगररांगात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. येथे विजयनगर साम्राज्याचा सुमारे 2500 टन सोन्याचा खजिना असल्याचे मानले जाते.  इथल्या नेल्लामाला पर्वतरांगातही अनेक ट्रेझर हंटर खजिन्याच्या शोधात आहेत. 2018 मध्ये इथल्या जंगलात 2 ते 3 ट्रेझर हंटर्स मारले गेले.

हंपीमधील बर्‍याच पुरातन स्थळांचे नुकसान

हंपीला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. बेल्लारी ते हंपी पर्यंतच्या 4100 हेक्टर क्षेत्रावर पुरातत्त्वविषयक महत्त्व असलेले 1600 हून अधिक स्मारके आहेत. या स्मारकांमध्ये विजयनगरचा खजिना कोठेतरी लपलेला असल्याची मान्यता आहे. बर्‍याच ट्रेझर हंटर टोळक्यांनी या स्मारकांचे येथे नुकसान केले आहे. अनेक मूर्ती आणि शेकडो वर्ष जुन्या नंदीच्या पुतळ्याचे नुकसान झाले आहे. येथे संरक्षणासाठी पहारेकरी आहेत, परंतु हे टोळके सर्व सुरक्षा असूनही या स्मारकांमध्ये खजिना शोधण्यासाठी येतात.

आंध्रच्या मुकांबिका मंदिरातही खजिना

आंध्र प्रदेशातील कोलूरमध्ये मुकांबिका देवी मंदिर आहे. येथे दक्षिण भारतातील राजांनी अनाकलनीय ठिकाणी बराच खजिना लपविला होता आणि आजही नाग त्या खजिन्याचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. येथे खजिन्याची शक्यता देखील अधिक आहे कारण इथल्या देवीचे सिंहासन सुमारे 90 किलो सोन्याचे आहे. देवीच्या मूर्तीवर 3 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे दागिने आहेत. आणि जवळजवळ 30 कोटी किंमतीचे हिरे आणि दागिने देखील येथे उपस्थित आहेत.  बाहेरील आक्रमणकर्त्यांना टाळण्यासाठी राजांनी गुप्त कोठारांमध्ये खजिना ठेवला होता असे मानले जाते. 

कृष्णा नदीकाठी कोहिनूरची खाण

आंध्र प्रदेशातील गोलकुंडमध्ये कृष्णा नदीच्या काठावर हिऱ्याची खाण असल्याचे मान्यता आहे. भारताचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा याच खाणीतील असल्याचे मानले जाते. जगातील अद्वितीय हिऱ्यांपैकी 7 हिरे येथील असल्याचे मानले जाते. येथेही लोक प्रचंड संपत्ती आणि हिऱ्यांच्या शोधत लपून-छपून येतात आणि पकडले देखील जातात. मात्र ही खाण देखील एक रहस्याप्रमाणे आहे. असे मानले जाते की सुलतान मोहम्मद कुतुब शाह यांनी येथे काही भुयार खोदले, ज्यात त्याने आपला खजिना लपविला होता. ब्रिटिश सरकारने देखील 1936 मध्ये याचा शोध लावला होता. 

कुन्नूरमध्ये टीपू सुलतानच्या खजिन्याचा शोध 

केरळच्या कुन्नूर जिल्ह्यातील जंगलांबाबत म्हटले जाते की, येथे सम्राट टीपू सुल्तानचा खजिना लपवलेला आहे. त्याच्या शेवटच्या दिवसांच्या लढाईत हा खजिना जपण्यासाठी तो जंगलात कुठेतरी लपला होता. गेल्या दहा वर्षांपासून इथल्या काही भागातील रहिवासी ट्रेझर हंटर्समुळे त्रस्त आहेत. गेल्या दहा वर्षांत, शहराबाहेरील वसाहतींच्या आसपासच्या जंगलात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, जे अर्वंचल-पायनुर महामार्गावरील जंगलात हा खजिना शोधत आहे.

तेलंगाणाच्या भुवनगिरीचा खजिना 

तेलंगाणाच्या भुवनगिरी जिल्ह्यात ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेले यदाद्री मंदीर आहे. हे मंदीर डोंगरावर आहे. भुवनगिरीच्या पायथ्यावरील अनेक भागांमध्ये भुवनगिरीचा खजिना असल्याचा दावा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी येथील शेतात खजिना शोधताना काही लोकांना अटक केली होती. ज्यांच्याकडून प्राचीन हनुमान मूर्ती आणि पुरातत्व महत्त्व असलेल्या इतर काही गोष्टी सापडल्या. इथेही हजारो कोटींचा खजिना लपवल्याची दंतकथा आहे.