जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • व्यापार - व्यावसायात यश येत नसेल आणि खूप गुंतवणूक करूनही कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल तर वेळीच सावध व्हा. खूप प्रयत्न करूनही बिझनेसमध्ये यश येत नसेल तर खाली दिलेला उपाय करा, निश्चित फायदा होईल.कृष्ण तुळसीची पाने सर्वार्थ सिद्ध योगात आणून पिवळ्या कापडात बांधून खालील गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. नंतर ही पाने बांधलेल्या स्थितीतच दुकानात किंवा ऑफिसात ठेवा. आता दररोज दुकान उघडल्यावर त्या तुळसीच्या पानांसमोर थांबून 11 वेळा गणेश मंत्राचे पठण करा. 21 दिवसानंतर या प्रयोगाचा प्रभाव जाणवू लागेल....
  July 16, 04:05 PM
 • भारत हा परंपरांचा देश आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही परंपरा तर इतक्या जगावेगळ्या असतात की अन्य प्रांतातील लोकांसाठी त्या आश्चर्यजनक वाटाव्यात. तुम्हीही काही जगावेगळ्या परंपरा ऐकल्या असतील. पुण्य कमविण्यासाठी पूजा करण्यासारख्या परंपरा तुम्हाला माहीत असतील, मात्र पुण्य कमविण्यासाठी जोडे मारण्याची परंपरा तुम्ही याआधी ऐकली नसणार.अशीच एक परंपरा उत्तर प्रदेशातील इटावा येथे सुरू आहे. इटावाच्या बाहेर दतवली भागात एक मकबरा आहे. शेकडो वर्षांपासून येथे एक अनोखी परंपरा...
  July 16, 03:30 PM
 • तंत्र विद्या हे एक स्वतंत्र विज्ञान आहे. प्राचीन इतिहासाशी संबंधित अनेक प्रामाणिक ग्रंथांमध्ये तंत्र विज्ञानाशी संबंधित अनेक संदर्भ मिळतात. त्या काळातील यंत्रांच्या सहाय्याने अनेक अद्भुत कार्य संपन्न व्हायचे. अशी कामे आजच्या यंत्रांनाही शक्य नाही.विज्ञानाने आज अनेक घातक अस्त्र शस्त्र बनविले आहेत. प्राचीन काळात जोरदार पाऊस पाडणारे वरुणास्त्र होते. क्षणात भयंकर अग्निप्रलय निर्माण करू शकणारे आग्नेय शस्त्र होते. थोड्याच वेळेत लोकांच्या संवेदना बधीर करणारे संमोहन शस्त्र होते....
  July 15, 07:51 PM
 • अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. त्या साठीचा हा मंत्र - अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: । मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।। कुंकुमाने रंगविलेले शुभ्र...
  July 15, 05:37 PM
 • ज्या लोकांच्या कुंडलीत गुरू अशुभ असतो, त्यांना स्वत:विषयी संशय असतो. आपण यशस्वी होऊ अशी खात्रीही त्यांना नसते. त्यामुळे ते कधीच नेतृत्त्व करू शकत नाहीत. दुस-यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यातच ते आनंद मानतात. अशा लोकांचे विवाहही लवकर जुळून येत नाहीत. वाणी संबंधी दोषही असतात. इतरही काही समस्या भेडसावतात. परंतु खाली देलेल्या मंत्रांचा जप केल्यास सर्व अडचणी दूर होतील. या मंत्रांच्या जपाने प्रतिकूल गुरूही अनुकूल फळ देऊ लागेल. तांत्रिक मंत्रग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवै नम:बीज मंत्रओम बृं...
  July 14, 05:24 PM
 • ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मानुसार सात दिवसांचा सप्ताह असतो. हे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी निगडीत आहेत. प्रत्येक वाराशी निगडीत काही ना काही परंपराही आहेत. गुरूवारी घराची साफ सफाई करू नये अशी मान्यता आहे. इतकेच नाही तर गुरूवारी नख कापणे आणि केस धुणेही अशुभ मानण्यात आले आहे.शनिवार, मंगळवार आणि गुरूवारी ब्रह्मांडांतून येणारी किरणे मानवी मेंदूवर परिणाम करू शकतात. मानवी शरीरात बोटांचे टोक आणि डोक्याचा भाग हा संवेदनशील असतो. त्यामुळेच या दिवशी नख कापू नये. आपल्या धर्मशास्त्रात...
  July 14, 04:10 PM
 • यंदा शुक्रवार दि. 15 जुलै या दिवशी गुरूपौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरूपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सर्वजण आपापल्या गुरूंची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करून घेतात. कारण गुरूच्या कृपेशिवाय कधीही सफलता मिळू शकत नाही. ज्योतिष शास्त्रानुसारदेखील गुरूपौर्णिमेला महत्त्व आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरू प्रतिकूल स्थानी असेल, त्यांच्या जीवनात अनेक चढउतार येतात. या लोकांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी पुढील उपाय केल्यास अनेक अडचणी दूर होतील. - भोजनात केसरचा वापर करा आणि...
  July 13, 06:04 PM
 • संध्याकाळच्या वेळी पूजा अर्चा करणे हिंदू धर्मात महत्त्वाचे मानण्यात आले आहे. संध्याकाळची वेळ ही महत्त्वाची असते. या वेळेशी निगडीत अनेक प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. सूर्यास्ताच्या वेळी भोजन न करणे, झाडू न मारणे, अभ्यास न करणे अशा अनेक प्रथा आपल्याकडे पाळल्या जातात. या प्रथा पाळल्या नाही तर मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.संध्याकाळच्या वेळी दुस-यांना पैसे दिल्याने लक्ष्मी रूष्ट होते, असे शास्त्रात सांगितले आहे. संध्याकाळी पैसे दिल्याने व्यावसायात बरकत येत...
  July 13, 04:01 PM
 • धर्म शास्त्रांनुसार रामायणाच्या पठणाने पुण्यप्राप्ती होते आणि पापे नष्ट होतात. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात संपूर्ण रामायण वाचण्याची इच्छा असली तरी वेळ काढणे कठीण आहे. अशा वेळी खाली दिलेल्या मंत्राचा नित्य नेमाने जप केल्यास आपल्याला संपूर्ण रामायण पठणाचे पुण्य प्राप्त होते. या मंत्राला एक श्लोकी रामायणही म्हटले जाते. एकश्लोकी रामायण पुढीलप्रमाणे आहे.मंत्रआदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।बालीनिर्दलनं समुद्रतरणं,...
  July 12, 07:09 PM
 • वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण घराची रचना वास्तुपुरुषाच्या अनुरूप असावी. घर वास्तुपुरुषाला अनुरूप नसेल तर घरातल्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य कोप-यात पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना करण्यात यावी. घरातील ईशान्य कोप-यात देवाची प्रतिमा लावणे अधिक चांगले आणि शुभ असते.ईशान्य कोप-याला वास्तुपुरुषाचे डोके असते. त्यामुळे सात्विक ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून ईशान्य कोप-याचे स्थान आहे. ईशान्य दिशेचे अधिपती भगवान शिव आहेत. ईशान्य दिशेला...
  July 12, 06:04 PM
 • दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब आहे. एखाद्याला दृष्ट लागली की तो माणूस अस्वस्थ होतो. एखाद्या बाळा नजर लागली की बाळ सतत रडू लागतं. त्याला ताप चढते. बाळ चिडचिड करू लागते. आपल्याकडे दृष्ट काढायच्या अनेक पद्धती आहेत. येथे काही प्रभावी उपाय सांगत आहोत...- दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपवा. भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा. नंतर हा तुकडा चुलीत टाकून द्या.- मीठाचे सात खडे, सात लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपवून सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा. नंतर...
  July 11, 05:24 PM
 • झाडूने कचरा एकत्रित केला जातो. कच-याला दारिद्य्राचे प्रतीक मानण्यात येते. योग्य वेळी झाडू माणे शुभशकून तर अयोग्य वेळी झाडू मारणे अपशकून मानले जाते. आपल्या संस्कृतीत झाडूला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात नियमित स्वच्छता केली जाते तिथे सुख शांती असते. याउलट ज्या घटात जळमटे, धूळ, घाण असते तिथे दारिद्य्राचा वास असतो. अशा घरात राहणा-यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते.त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्याचा आग्रह असतो. घरातून दारिद्य्र दूर व्हावे, महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी,...
  July 11, 05:16 PM
 • कोर्टात खूप वर्षांपासून तुमची केस चालू आहे काय ? यामुळे तुम्हाला मनस्ताप होत असणार. आता तुम्ही कोटातील केसची काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण खाली देलेला सोपा उपाय करा. या उपायाने कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा असू द्या. मंगळवारपासून रोज संध्याकाळी चार-पाच वाजता चपात्यांना तूप साखर लावून कावळ्यांस खायला घाला. केस चालू आहे तोपर्यंत हा तोटका करीत राहा. तारखेच्या दिवशी त्या कावळ्यांपैकी एखाद्या कावळ्याचा एक पंख आपल्या खिशात टाकून कोर्टात जा. या...
  July 10, 06:02 PM
 • लग्न म्हणजे सात जन्मांचे बंधन. लग्नामुळे दोन घरं जोडली जातात. आपला देश खूप मोठा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात चालीरीतींमध्ये थोडी भिन्नता आढळते. परंतु मूलभूत गोष्टी सारख्याच आहेत. प्राचीन काळी भारतातील विवाह पद्धती आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती.त्याकाळी मुलाकडची मंडळी वरात घेऊन यायचे तेव्हा मुलाच्या स्वागतासाठी स्वत: मुलगी समोर येत असे. त्यानंतर दोघेही आपापल्या स्थानी स्रान करून विवाह संस्कारासाठी एकत्र येत. वर हा कन्या पक्षाकडे पोहोचला की, कन्या यज्ञवेदीजवळ येऊन म्हणत असे की, या......
  July 10, 05:56 PM
 • प्रत्येकाला आपल्या भावी पती किंवा पत्नीबद्दल ब-याच अपेक्षा असतात. मुलगा असेल तर त्याला वाटतं की, आपली बायको सुंदर असावी आणि सुशीलही असावी. ती आपल्या सुख दुखात सहभागी होणारी असावी. तिच्या येण्याने याच्या जीवनात आनंद उल्हासाचे आगमन व्हावे, असेही वाटते. जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर खालील मंत्राचा विधिवत जप करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल.मंत्र. ओम विश्वावसुर्नाम गंधर्व: कन्यानामधिपति: सुरुपां सालंकारां कन्यां देहि मे नमसत्स्मै विश्वावसवे स्वाहा दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ करा....
  July 9, 08:18 PM
 • प्राचीन काळापासून मनुष्य प्रार्थना करीत आला आहे. अडचणींमधून वाचण्यासाठी, भीतीपासून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा पाश्चात्य देशांमध्ये चालत आली आहे. भारतातही प्रार्थना प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. मात्र येथे एक मूलभूत फरक आहे. आम्ही ईश्वराचेच अंश आहोत. ईश्वराने आमच्या ईश्वरत्वाकडे जायच्या वाटचालीत कृपा करावी. मुक्तीचा मार्ग सुलभ व्हावा, अशी भावना प्रार्थनेमागे आहे. उदात्त भावनेतून केली जाणारी प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ असते. ईश्वराकडे आपल्या मनोकामना पूर्ण...
  July 9, 08:10 PM
 • काही लोकांना शत्रू फार असतात. मित्र कमी आणि शत्रू जास्त अशी स्थिती असते. हे शत्रुत्व कोणत्याही कारणाने असू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींना शत्रूंची भीती वाटणे स्वाभाविक आहे. अशा वेळी शत्रूंशी मैत्री करण्याची इच्छा होते. शत्रूच्या मनातून वैरभाव संपविणे कठीण आहे. परंतु खाली दिलेला मंत्र प्रभावी आहे. या मंत्राच्या साधनेमुळे शत्रूही मित्र बनतो. मग तो स्वप्नातही तुमचे अहित चिंतणार नाही. मंत्रगरल सुधा रिपु करहिं मिताई, गोपद सिंधु अनल सितलाईजप विधिसकाळी आंघोळ करून प्रभू रामचंद्रांची पूजा...
  July 9, 04:55 PM
 • आई होणे ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. मातृत्त्वाचे क्षण हे केवळ त्या स्त्रीसाठीच नव्हे तर सा-या कुटुंबासाठीही आनंद देणारे असतात. त्यामुळेच गर्भवती महिलेची सर्वांकडूनच अधिक काळजी घेतली जाते. आपल्या संकृतीत तर पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठविण्याची प्रथा आहे. गर्भवती महिला अधिक आनंदी राहावी, हाच यामागचा उद्देश. गर्भवतीच्या मनात बाळाचे जे चित्र तयार झालेले असते त्याच प्रकारचे अपत्य तिला होते, अशी मान्यता आहे.आईच्या विचारांचा आणि संस्कारांचा मोठा प्रभाव बाळावर...
  July 9, 04:09 PM
 • अंगात ताप भरणे हा सर्वसामान्य आजार आहे. ताप कोणालाही येऊ शकतो. या आजारात शरीर गरम होते किंवा खूप थंडी वाजते. अन्नावरील वासना उडते. भूक लागत नाही. काही खायला गेलं तर तोंडाला कडवट चव आल्याने जेवण जात नाही. साधारणपण ताप येण्याचे कारण व्हायरल आहे. अर्थात विषाणूमुळे ताप हा आजार होतो. डॉक्टरांकडून उपचार केल्यावर आराम मिळतो. कधी कधी डॉक्टरी इलाजानंतर ताप उतरत नाही. अशा वेळी मंत्र उपचार केल्यास लाभ होतो. या मंत्राचे वर्णन श्रीमदभगवदगीतेत आहे.तापाने आजारी असलेल्या माणसाने या मंत्राचा थोड्या थोड्या...
  July 8, 07:52 PM
 • मंदिरात गेल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. सुखाची अनुभूती होते. म्हणूनच लोक नियमीतपणे मंदिरात जातात. कोणत्याही मंदिरात आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येते. भगवंताची प्रतिमा किंवा भगवंताचे चित्र पाहिले तरी मन शांत होते. प्रत्येकजण देवापुढे वेगवेगळ्या प्रार्थना करीत असतात. साकडे घालीत असतात. काहीजण मनातल्या मनात देवाकडे आपल्या अडचणी समस्या मांडत असतात. देवापुढे मनातले भाव व्यक्त केले तरी मनावरचा सारा भार हलका होऊन जातो. मनातली अस्वस्थता नष्ट होऊन जाते.परंतु काही...
  July 8, 04:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात