आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोग्य:उन्हाळ्यात सातू खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उन्हाळाच्या दिवसात सातू (सत्तू) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे

उन्हाळाच्या दिवसात सातू (सत्तू) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सातू हे चवदार तर असतेच, परंतु त्याचे आरोग्याला फायदेही होतात. जाणून घेऊया सातूचे फायदे.......

सातूचे पीठ तयार करण्याची कृती : सातूचे पीठ करण्यासाठी गहू/जवस आणि/किंवा हरभऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजावी त्यात चवीसाठी जिरे टाकून दळून आणावे.

१. उन्हाळ्यात सातूचे सेवन केल्याने आपण उष्माघात आणि उष्णतेपासून बचाव होतो. यामुळे उष्णता कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.

२. आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत असल्यास किंवा भूक सहन होत नसल्यास सातू खाणे फायदेशीर आहे. हे खल्ल्यामुळे किंवा याच्या सरबताचे सेवन केल्यावर भूक लागत नाही.

३. सातू हा प्रथिनांचा स्रोत आहे. पोटाचे सर्व त्रास दूर होतात. पोटदुखी बरी होते. सातू खाल्ल्याने यकृत बळकट होतो. अॅसिडिटीचा त्रास दूर होतो. सहज पचन झाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

४. जव आणि हरभऱ्यापासून बनवलेले हे सातू मधुमेहासाठी फायदेशीर असते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज सातूचे सेवन केल्यास फायदा होतो. सातू पाण्यात घोळून सरबत बनवून घ्यावे किंवा मीठ घालूनदेखील घेऊ शकता.

५. शरीरात थकवा जाणवल्यास सातू खाल्ल्याने ऊर्जा मिळते. अशक्तपणा दूर करून आपल्याला उत्साही ठेवण्यास प्रभावी आहे. यामध्ये बरेच पोषक घटक आढळतात

६. अंगाची जळजळ कमी करते. पाण्यात घोळून प्यायल्याने शरीरामधील पाण्याची कमतरता दूर होते. तहान पण शमते.

७. सातूच्या सेवनाने गळ्याचे आजार, उलटीचा त्रास, डोळ्यांचे आजार आणि इतर आजार बरे होतात.

८. यातील प्रथिनांमुळे स्नायूंना बळकटी मिळते

९. लठ्ठ लोकांसाठी सातू हा रामबाण उपाय आहे. जवाचे सातू दररोज खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत होऊन सडपातळ अंगकाठी मिळवू शकता.

१०. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सातू खाणे फायदेशीर आहे.

0