आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • 10 Kg Extra Weight Can Shorten Life By 3 Years, Sleeping In Bed And Using Mobile Phones Also Increases The Risk Of Obesity

26 नोव्हेंबरला लठ्ठपणाविरोधी दिन:10 किलो अतिरिक्त वजन 3 वर्षांचे आयुष्य कमी करू शकते, बेडवर झोपून मोबाइल वापरल्यानेही वाढतो लठ्ठपणाचा धोका

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताज्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातील सुमारे २३ टक्के पुरुष आणि २४ टक्के स्त्रिया ओव्हरवेट किंवा लठ्ठ आहेत. एवढेच नाही, तर ५ वर्षांखालील सुमारे ३.४ टक्के मुले लठ्ठपणाच्या विळख्यात आहेत. लठ्ठपणा लवकरच देशात महामारी बनणार आहे. डब्ल्यूएचओच्या मते, शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे टाइप-२ मधुमेह, १३ प्रकारचे कर्करोग, हृदयविकार आणि फुप्फुसाचे आजार होण्याचा धोका वाढतो. एवढेच नाही, तर मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. सन २०२१ मध्ये जगभरात लठ्ठपणाशी संबंधित आजारांमुळे सुमारे २८ लाख लोकांचा मृत्यू झाला. एका संशोधनानुसार, १० किलो अतिरिक्त वजन सरासरी वय तीन वर्षांनी कमी करू शकते. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीचे वजन ३० किलो जास्त असेल तर त्याच्या आयुष्यातील १० वर्षे कमी होऊ शकतात.

वजन नियंत्रित करण्याच्या प्रभावी पद्धती *न्याहारीत अधिक प्रथिने खा : भुकेचे संप्रेरक संतुलित करतात प्रथिने पचनाची प्रक्रिया धीमी असते आणि ते भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सनाही धीमे करतात, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. परिणामी, अन्नाच्या स्वरूपात जाणाऱ्या कॅलरीज कमी होतात.

*मनाला ट्रेंड करा : कारण संतुलित आहार ही एक सवय आहे कोणतीही नवीन सवय किंवा दिनचर्या अंगीकारायला खूप वेळ लागतो. तुम्ही रोज काही तरी नवीन (कमी कॅलरी, संतुलित आहार) फॉलो करता तेव्हा मेंदू हळूहळू त्याचा अवलंब करतो आणि त्याचे सवयीमध्ये रूपांतर करतो.

*वजन घटवत असल्यास लक्ष्य मोठे ठेवा : निष्काळजीपणाचा धोका घटतो वजन घटवण्यासाठी नेहमी मोठे ध्येय ठेवा. कारण छोटे ध्येय साध्य करण्याच्या आनंदात निष्काळजीपणाचा धोका वाढतो, त्यामुळे पुन्हा वजन वाढण्याचा धोका असतो. तर, मोठी उद्दिष्टे दीर्घकाळ प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतात.

वजन वाढवणाऱ्या दररोजच्या सवयी *सकाळी पाणी न पिणे : चयापचय मंदावते सकाळी प्यायलेले कोमट पाणी आतडे स्वच्छ करते आणि चयापचय सुधारते, त्यामुळे जास्त कॅलरी बर्न होतात. पाणी न प्यायल्याने चयापचय मंदावते. वजन वाढण्याचा धोका वाढतो.

*खूप कमी किंवा जास्त झोपणे : कॅलरीजचे प्रमाण वाढते जे लोक ५ तास किंवा त्याहून कमी झोपतात त्यांच्या पोटावर चरबी वाढण्याची शक्यता दुप्पट असते. त्याच वेळी ९ तास किंवा त्याहून अधिक झोपेमुळे लठ्ठ होण्याचा धोका २१% जास्त असतो. हे हार्मोन्समुळे होते, ते भूक वाढवतात.

*रात्री झोपताना फोन वापरणे : मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम होतो फोनचा निळा प्रकाश झोपेचे चक्र नियंत्रित करणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो. त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. अपूर्ण झोपेमुळे घ्रेलिन हार्मोन वाढू लागतो, त्यामुळे व्यक्ती जास्त आहार घेतो.

योग्य वजनासाठी सूत्र : फायदेशीर गोष्टी नेहमी समोर ठेवा अमेरिकन संशोधक सुझान फेलन यांच्या मते, आपण जे पाहतो तेच खातो. अशा परिस्थितीत आपले वजन कमी झाले असेल आणि ते टिकवून ठेवायचे असेल तर कमी कॅलरी असलेले अन्न उदा. हंगामी फळे, नट, ओट्स, अंकुरलेले धान्य इ. जास्तीत जास्त आवाक्यात ठेवा, जेणेकरून भूक भागवायची असेल तेव्हा खाता यावेत. तथापि, उच्च उष्मांक आणि कमी फायदेशीर गोष्टी उदा. कोल्ड्रिंक्स, सोडा, चिप्स, डबाबंद अन्न इ. दृष्टीपासून दूर ठेवा. याशिवाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय खातो यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची नोंद ठेवा.

तज्ज्ञांना विचारा प्रश्न अधिक वजन किंवा लठ्ठपणामुळे होणाऱ्या नुकसानीसंबंधी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तज्ज्ञांना विचारू शकता. यासाठी ९१९०००००७१ वर मिस्ड कॉल द्या. मोबाइलवर एसएमएसद्वारे गुगल फॉर्म येईल. प्रश्नांसह तो भरा आणि पाठवा. प्रश्नांची उत्तरे १ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध होतील.

डॉ. विनय शॉ सीनियर कन्सल्टंट, सनार इंटरनॅशनल हॉस्पिटल, गुरुग्राम

बातम्या आणखी आहेत...