आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉलेज:आयुर्मान वाढवू शकणारे 14 मेडिकल इनोव्हेशन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • MNRA तंत्रज्ञान कर्करोगाविरोधात आशा, मिनी प्रोटीन्स, सुपर सेल्स शरीराला तरुण ठेवेल

गेल्या शतकात मानवाने लाइफ एक्सपेक्टन्सी रेट म्हणजे आयुर्मान दर दुप्पट करून दाखवला. NYT ने जगभरात सुरू असलेल्या काही शास्त्रीय संशोधनांनुसार शास्त्रज्ञ पुन्हा एकदा असे करू शकतील का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पुढील पाच वर्षांत शक्य असणारे नवे उपक्रम
१. लाइफ सप्लिमेंट्स

अल्फाकीटोग्लुटेरेट...हे आयुर्मान वाढवणारे संयुग आहे. याचा उंदरावर केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. माणसाचे वाढते आयुर्मान ते थांबवू शकतात. अजून संशोधन सुरू आहे.

२. लठ्ठपणावरचे औषध
लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी आपले आयुर्मान दर दहा वर्षांपर्यंत घटवू शकते. शास्त्रज्ञांनी यावर एक महत्त्वाचे औषध विकसित केले आहे. वजन घटवण्याचे हे औषध सध्याच्या औषधांपेक्षा दुप्पट उपयोगी आहे.

३. सुपर पॉवर पेशी
एलेमिप्रीटाइड हे एक असे औषध आहे, जे पेशींच्या पॉवर प्लांट्स म्हणजेच मायटेकाँड्रियाला पुन्हा संचयित करू शकते. हे मायटेकाँड्रियल आजारांविरोधात परिणामकारक आहे.

४. न्यू नॉर्मल : मास्क
केवळ मास्क वापरल्यामुळे जगभरातील लाखो मृत्यू रोखले जाऊ शकतात. महामारीच्या पूर्वी अमेरिकेत इन्फ्लुएंझामुळे वर्षात ६० हजार जणांचे प्राण जायचे. मास्क अनेक नवे विषाणू रोखेल.

५. जिनोम डिकोडिंग
शंभर वर्षांपेक्षा अधिक जगणाऱ्या लोकांच्या दीर्घ आयुर्मानाचे गुपित काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ जिनोम डिकोडिंग करत आहेत. त्यातून खूप उपयोगी माहिती मिळू शकते.

६. मिनी प्रोटिन्स
मायक्रोपेप्टाइड हे प्रोटीन आपला फिटनेस अनेक पटींनी वाढवू शकतो. इतकेच नाही, तर हे लठ्ठपणासह अनेक आजार रोखू शकते.
याचा मनुष्यावर वापर करण्यासाठी चार वर्षांत परवानगी मिळू शकते.

७. MRNA लस : कोरोनाच्या विरोधात सर्वात अगोदर या तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना प्रोस्टेट, ब्रेस्ट आणि कोलोरेक्टल कर्करोगाविरोधात लढण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.

हे नवे उपक्रम जे ५ ते १० वर्षांत शक्य होतील...
८. कारमध्ये ब्रेथलायझर :
सर्व कारमध्ये ब्रेथलायझर असेल. ही डिटेक्शन टेक्नॉलॉजी आहे. यामुळे दारू प्यायलेला चालक गाडी सुरू करू शकणार नाही.

९. वृद्धत्वाचे औषध : मेटामॉर्फिन हे मधुमेहाचे औषध कर्करोग, हृदयरोगावरही प्रभावी. वृद्धत्वावर संशोधन सुरू.

१०. तरुण रक्ताचे गुपित : तरुण रक्ताच्या केमिस्ट्रीवर वैज्ञानिक काम करत आहेत. रक्तामध्ये प्लाझ्मा किंवा इतर घटक जोडून आयुष्यमान वाढेल.

११. एचआयव्हीवर उपचार : फंक्शनल क्युअरवर संशोधन सुरू. विषाणूला निष्क्रिय करता येईल.

हे आगामी १० ते २० वर्षांत शक्य...
१२. डिझायनर जीन्स : जीन थेरपी खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. डिझायनर जीनमुळे कर्करोग, मधुमेह आणि स्वयंप्रतिरोधक रोगांसह अनेक आजार रोखू शकू.

१३. लॅबमध्ये व्हा तरुण : शास्त्रज्ञ अवयवाच्या आतील छोट्या रक्तवाहिन्यांची जटिल प्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात यश आल्यास लॅबमध्ये मूत्रपिंड, यकृत आणि हृदयासह अनेक अवयव विकसित केले जाऊ शकतात.

१४. आयुर्मान वाढवणारे औषध : रेपामायसिन अँटिफंगल औषध आहे. ते आॅर्गन रिजेक्शनच्या अवस्थेचा सामना करण्यासाठी तयार केले. यातून उंदराचे एकतृतीयांश आयुर्मान वाढवण्यात यश आले. इतर जिवांवर चाचण्या सुरू आहेत. मानवावरही होतील.

बातम्या आणखी आहेत...